रजोनिवृत्ति -
रजोनिवृत्ति म्हणजे स्त्रीमध्ये जेंव्हा रजस्त्राव होणे पूर्णतः बंद होते त्या अवस्थेस रजोनिवृत्ति असे म्हणतात. रजोनिवृत्ति ही एक प्रत्येक स्त्रीमध्ये ठराविक काळानंतर येणारी एक सामान्य अवस्था असते. या अवस्थेमध्ये स्त्रीच्या प्रजनन अवयवामध्ये क्षीणता येण्यास सुरवात होते, शरीरामध्ये हॉर्मोनल परिवर्तन होते आणि त्यामुळे मासिकस्त्राव अंतिमतः बंद होण्यास सुरवात होते.

रजोनिवृत्ती काळ -
रजोनिवृत्ती 40 ते 55व्या वर्षी प्रामुख्याने आलेली आढळते.
रजोनिवृत्ती काळाचे सरासरी वय हे 47 वर्ष इतके आहे.

कालावधीजन्य विकृती -
जर वयाच्या 40शी पुर्वीच आल्यास त्या विकृतीस अकाली रजोनिवृत्ती (Precocious Menopause) असे म्हणतात.
आणि वयाच्या 55व्या वर्षानंतर जर रजोनिवृत्ती झाल्यास त्या विकृतीस  विलंबित रजोनिवृत्ती (Delayed Menopause) असे म्हणतात.

रजोनिवृत्तीची कारणे -
का येते रजोनिवृत्ती ?
वाढत्या वयानुसार शरीरात अनेक प्रकारचे बदल होत असतात आणि ते स्वाभाविकच असतात. प्रत्येक महिन्याला येणाऱया मासिक स्त्रावामध्ये बदल होणे व क्रमाक्रमाने मासिक स्त्राव येणे थांबणे म्हणजे रजोनीवृत्ती.
स्त्रीयांमधील डिम्बग्रंथीत वाढत्या वयाबरोबर निष्फलता उत्पन्न होते. त्यामुळे शरीरात ईस्ट्रोजेनचा अभाव निर्माण होऊन रजोनिवृत्ती उत्पन्न होते.
साधारणतः पूर्ण वर्षभर जर मासिक स्त्राव आला नसेल तर निश्चितपणे रजोनीवृत्ती सुरु झाली असे म्हणता येईल.

पुढे वाचा »

मुख़्य विभाग -  स्त्रियांचे आरोग्य

Tags - Menopause information in Marathi, Menopause in Marathi, Female Health in Marathi, Marathi health site.